India
08042755546
+919860633147

जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र , नाशिक महिलांच्या कोरोन...

जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र , नाशिक महिलांच्या कोरोना लसीकरण बाबत... 🤰🏻 गरोदर महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी का? नाही. केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये गरोदर महिलांनी ही लस घेऊ नये, ' असे स्पष्टपणे सांगितले आहे. गर्भवती महिलांनी यासाठी लस घेऊ नये गर्भवती महिलांना ही लस घेता येणार नाही. गर्भवती असताना अनेक प्रकारच्या लशी टाळण्यात येतात. कोरोनासाठीच्या या लशीत निष्क्रिय जिवंत विषाणू असल्यामुळे ही लस गर्भवती महिलांना देता येत नाही. 🤱🏻 स्तनपान करणाऱ्या महिलांनी लस घेणे योग्य ठरले का? नाही. 'स्तनपान करणाऱ्या महिलांनी ही लस घेऊ नये' असे केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. 👫🏻 गर्भधारणेचा प्रयत्न करणाऱ्यांनी महिलांनी लस घ्यावी का? गर्भधारणा होण्यापूर्वी लस घ्यायला काहीच हरकत नाही. परंतु गर्भधारणेची तुमची ट्रिटमेट काय आणि कशाप्रकारे सुरू आहे, त्याबाबत तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 🤰🏻 कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस घेतला आणि त्यानंतर गर्भधारणा राहिल्यास दुसरा डोस घ्यावा का? तुम्ही कोरोना प्रतिबंधक लस पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर पहिला डोस घेतल्यानंतर आणि दुसऱ्या डोस घेण्यापूर्वीच्या कालावधीत तुम्हाला गर्भधारणा झाली असेल, तर तुम्ही दुसरा डोस घेऊ नका. 🙎🏻‍♀️ मासिक पाळी असताना लस घ्यावी का? मासिक पाळी सुरू असताना लस घेण्यास काहीच हरकत नाही.त्यामुळे मासिक पाळीच्या दिवसात लस घेतली तरी चालणार आहे. 💁🏻‍♀️ पीसीओडी, ओव्हरी सिस्ट यांसारख्या समस्या असल्यास लस घेणे योग्य आहे का? आजकाल अनेक मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये पीसीओडी, ओव्हरी सिस्टच्या समस्या दिसून येतात. त्यामुळे अशा आरोग्य विषयक समस्या असणाऱ्या महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याला हरकत नाही. वैद्य स्नेहल जाधव-9766125487 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म व गर्भसंस्कार केंद्र, नाशिक
 2021-04-28T12:39:54

Keywords

footerhc