India
08042755546
 India
08042755546
+919860633147

Testimonials

testimonial image
teacher

मी निरज सिनकर वय ३० वर्षे, सा. नाशिक. आज दि. १२ /०४ /२०२६ रोजी हरिवल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल येथे ८ शिरोधारा व पादाभ्यंग थेरपी घेतली. येथे खूप छान उपचारपद्धती व शांत व मनमोहक वातावरण तयार केले आहे. या वातावरणात ही थेरपी घेतल्यामुळे मला खूप छान प्रसन्न व शांत वाटले. कितीतरी दिवसांचा थकवा, तणाव दूर झाल्याचे जाणवले. खूप Relax & Calm feel होत आहे. Thank You.

testimonial image
farmer

मी अमोल गोविंद बागड. मी गेल्या १० वर्षांपासून हरिवल्लभ हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या निमित्ताने येते. आज मी शिरोधारा घेण्यासाठी आले होते आणि मला खूप छान वाटले. डोकं एकदम शांत झाल्यासारखं वाटत आहे. खूप छान अनुभव होता. मी सर्वांना सांगेन की तुम्ही सुद्धा एकदा शिरोधारा करून बघा आणि अनुभव घ्या. Thank You. Harivallabh.

testimonial image
Teacher

नमस्कार, मी सौ. वैशाली अनंत बागड. मी गेल्या १० वर्षांपासून Dr. Snehal Mam कडे येत आहे. मला त्यांच्या कडे विशेषतः डोकेदुखीसाठी किंवा मायग्रेनसाठी होणाऱ्या त्रासासाठी येत होते. आज मी शिरोधारा करण्यासाठी आले होते. माझा जॉब प्रोफाइल खूप स्ट्रेसफुल असल्याने नेहमी तणावाखाली राहते. धावपळीचे जीवन असल्यामुळे असते. आज मी शिरोधारा केली आणि मला डोक्याला रिलॅक्स आणि फ्री वाटत आहे. खूप छान अनुभव होता. खूप Refreshing आणि Stress Free वाटत आहे. हरिवल्लभ हॉस्पिटलचे खूप खूप धन्यवाद. Thank You So Much.

testimonial image
housewife

नाव: सौ. पुनम प्रदीप बच्छाव पत्ता: ओंकारेश्वर कॉलनी, (अमृतधाम), नाशिक अभिप्राय: मी आज येथे शिरोधारा व पादाभ्यंग करण्यासाठी आले होते. शिरोधारा करत असताना अतिशय शांत वाटले. डोक्याला तसेच शरीराला खूप शांत वाटले. पादाभ्यंग करत असताना पायाची चांगली मसाज झाली. त्यामुळे मला मोकळे झाल्यासारखे वाटले व खूप आराम पडला. त्यामुळे आपली अतिशय आभारी आहे. धन्यवाद

testimonial image
housewife

माझे नाव नयना भाऊसाहेब बच्छाव. मी प्रथम वमन हे पंचकर्म केले. मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. मी चार दिवस ह्या हॉस्पिटलमध्ये येत होते. खूप चांगल्या प्रकारची काळजी घेतली. प्रत्येक वेळी सांगण्यात आलेले पथ्य मी पाळले व खूप सुधारणा झाली डॉ. सर व मॅडम यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले व Assistant यांनीही वेळोवेळी खूप चांगल्या प्रकारे मदत केली. आपले समजून घेणे, माहिती सांगणे व पंचकर्म करताना होणारी सर्व माहिती चांगल्या प्रकारे समजावून देण्यात आली. खूपच चांगले वाटले. मला असे म्हणावेसे वाटते की पूर्ण हॉस्पिटल हे फॅमिलीसारखे (कुटुंबासारखे) वाटले. यापूर्वी खूप हॉस्पिटलमध्ये गेले पण अशी स्वच्छता कुठेच नाही पाहिली. खूपच चांगले वातावरण व सेवा आहे. येथील चार दिवस खूपच चांगल्या प्रकारे गेले. त्यामुळे या ठिकाणी आल्याचा मला खूप आनंद झाला. खरोखरच खूप चांगला अनुभव आला. मी म्हणेन की येथे डॉक्टरांचे तसेच Assistant यांचे मनापासून आभार मानावेसे मला वाटते. येथे खूप चांगले वातावरण व आनंदही मिळाला. Thank you so much, Sir and Ma'am.

testimonial image
Engineer

Best Ayurvedic Hospital I have seen ever. As we enter the hospital, you feel very positive. I felt that as if I have come to a temple, not a hospital. Very important, the staff, team and all doctors are very supportive. They make us feel like our own home. They never hesitate to assist. The whole hospital is available 24/7 to help us. Great experience. Worth visiting. Lots of learning. – Amruta Ameya Khobde (Pune)

testimonial image

मी सौ. सुनीता रवींद्र जोशी. नोव्हेंबर २५ पासून मी वैदय जीवन जाधव यांची treatment सुरू केली मला Manopause तसेच पोटाचा विकार हे त्रास होत होते. याच कारणांमूळे मानसिक अस्वस्थतता पण होती. परंतु मला अतिशय चांगल्या पद्‌धतीने treatment सुरु केली. दिलेली औषध वेळेने होते, पण्याबदल जानूक राहये यासाठी पंचकर्मासाठी मी Hospital या ॲडमिट झाले होते. अतिशय उत्तम व्यवस्था अहि. पूर्ण team छान handle करत असते. 'रुग्ण नाही -- आरोग्य सेवक ही संकल्पनाच निम्म बर करते. Treatment सुरु करण्यापूर्वी औक्षण, मंत्रपठण, प्रार्थना... वेगळेच बळ देतात, उर्जा देतात. तसेच मी Cosmetics वापरत आहे जे वैद्य स्नेहल मैम बनवतात व ते उत्तम आहे. from bottem my heart, I would like to express my gratitude to Dr. Jeevan Jadhav & Team.

testimonial image

“IBS affected my daily routine and mental peace for a long time. I tried multiple treatments but got only temporary relief. After consulting Dr. Jeevan Jadhav, I finally felt heard and understood. His Ayurvedic approach, Panchakarma therapy, and diet guidance helped restore my digestion step by step. Today, I feel lighter, calmer, and more confident.” https://www.instagram.com/reel/DNXmGA4x8ww/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

testimonial image

I, Mr. Ranu Bhimrao Jadhav, Mhasrul, Nashik. I underwent vamana procedure in February. There was one apprehension about Vamana but after the actual procedure it got cleared. After that I feel light

testimonial image

hello My name is Sarang Sanjay Dixit m. Dr. Jeevan Jadhav sir has been taking treatment for last 3 week skin diseases. As a part of treatment sir asked me to do vamana. Vaman Kriya lasts for 4 days.

testimonial image
Benifits of Panchakarma snehan swedan

मी प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरिक्षक सुप्रिया राजगुरु मला इथली माहिती नाशिकमध्ये मिळाली. माझी सध्या खूप धावपळ होते.. येथे पंचकर्मे स्नेहन स्वेदन केल्यावर body relax झाली डॉ जीवन व मॅम आणि इतर स्टाफ पण छान आहे (सुप्रिया विठ्ठल राजगुरु)

testimonial image
Medicinal Garbh Sanskar

नमस्कार मी सौ सारिका अजिंक्य साळुंके पुण्यातून बोलतेय मी चांगली गर्भधारणा राहण्यासाठी वैद्य जीवन सरांना पुणे सदाशिव पेठ येथील त्यांच्या आयुर्वेदिक दवाखान्यात जानेवारी 2022 मध्ये भेटले होते सरांच्या मार्गदर्शनाने व योग्य आयुर्वेदिक उपचाराने मला फेब्रुवारी मध्ये लगेच गर्भधारणा निसर्गतःच राहिली त्यानंतर लगेचच मी जीवन सरांचे जिजाऊ गर्भसंस्कार वर्ग जॉईन केले आणि माझी 29 सप्टेंबर 2022 रोजी डिलिव्हरी झाली आत्ता कळतंय खरंच गर्भ संस्कार करणे खूप गरजेचे आहे, आपल्याला जाणवते बाळ झाले कि आपले बाळ इतर बाळांपेक्षा वेगळ म्हणजे फुल्ल ऑफ एनर्जी असत . माझे बाळ जिजाऊ गर्भ संस्कार मुळे खूप ऍक्टिव्ह आणि छान असे आहे. मला जिजाऊ गर्भ संस्कार चा खूप फायदा झाला आपण जे 9 महिने श्लोक मंत्र म्हणतो ऐकतो त्याचा बाळा ला खूप फायदा होतो माझ बाळ रडत असेल तर ओंकार म्हटल्यावर शांत राहते खरं ती मोव्हमेन्ट कॅपचर करायची आहे मला कॅपचर केली की मी ती मोव्हमेन्ट नक्की सर्वांना शेअर करेल माझा बाळ फर्स्ट डे च स्वतःची मान उचलत होते शिवाय अर्ध कुशी सुद्धा होत आहे जिजाऊ गर्भ संस्कार चा आणि जीवन सरांनी जे वेळोवेळी मला मार्गदर्शन केले त्यानुसार मी सर्व व्यायाम आणि खाणे चालू ठेवले त्यामुळे मी हे 9 महीने खूप छान बिना त्रासाचे व एंजॉय पूर्ण गेले माझा गर्भिणी काळातील diabetes सुद्धा आयुर्वेदिक औषधाने खूप छान नियंत्रणात राहिला धन्यवाद जीवन सर आयुर्वेदिक औषधां मुळे जन्मताच बाळांमध्ये प्रतिकारशक्ती भरपूर असते माझे सर्वांना हेच सांगणे राहील सर्वांनी सर सांगतील त्याप्रमाणे अनुसरण करा जेणेकरून आपली पुढची पिढी खूप हुशार सुदृढ निरोगी होईल त्यांच्यावर चांगले संस्कार होतील आत्ताचे प्रदूषणयुक्त वातावरणाला सामोरे जाण्यासाठी आयुर्वेदिक औषधी गर्भसंस्कार आणि वैदिक ऑनलाइन सेशन चे जिजाऊ गर्भसंस्कार खूपच महत्वाचे आहे. पुनःश्च जीवन जाधव सर आणी जिजाऊ गर्भसंस्कार यांना खूप खूप मनःपूर्वक धन्यवाद मला एव्हडे छान मदर हूड दिल्या बद्दल

footerhc