India
08042755546
+919860633147

एक पाऊल आरोग्याकडे ... लेखक/अभ्यासक :- वैद्य जीवन...

एक पाऊल आरोग्याकडे ... लेखक/अभ्यासक :- वैद्य जीवन जाधव(आयुर्वेदाचार्य) श्रावण महिना शिव पिंडसाधना -आयुर्वेदिक महत्व श्रावणात शिव शंकराची पूजा का करायची?बेल पत्र का वाहायचे?त्याच्या मागचे आयुर्वेदिक महत्व काय? वैज्ञानिक महत्व काय? एकदा नक्की समजून घ्या श्रावण महिना म्हणजे पावसाळा. ह्या पावसाळ्यात पोटाचे आजार, पचनाचे आजार, जुलाब, अजीर्ण होणे, गॅसेस होणे, पोट दुखी होवून थकवा येतो.त्या साठी पुरातन शास्रात श्रावण महिन्यात उपवास व काही साधना सांगितलेली आहे त्याचा खरा अर्थ समजून घेवून वैद्य जीवन जाधव सरांच्या आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून... श्रावण साधना करताना अनेक वनस्पतींची व देवतांची साधना सांगितलेली आहे, सर्व साधना हया स्वरूप समजण्यासाठी असतात.शरीराच्या आत असलेल्या देवतांची साधना (निर्विकल्प) करताना बाह्य गोष्टींचा उपयोग करून (साविकल्प) साधना कारण्याचे विधान आहे, हे करत असताना अनेक आयुर्वेदिक वनस्पतींचा वापर करण्यासाठी सांगितलेला आहे.श्रावण महिन्यात विशेषतः भगवान शिवाची आराधना अधिक्याने केली जाते.शिव नाशाचे व नवनिर्मितीला प्रेरणा देणारी देवता आहे . पावसाळ्यात ही तसेच होते उन्हाळ्यातील तापामुळे नाश पावलेली सर्व वनस्पती पावसाने नव्याने उगवतात आणि सृष्टीला नव्याने ताजे तवाने करतात. ही नवनिर्मिती होताना शरीरात पित्त दोषाचा प्रकोप होवून अनेक पोटाचे आजार होतात, हे अनेक आजार साधना करताना अडचण निर्माण करतात, त्या मुळे शास्रात लंघन रूपी खाण्याच्या पदार्थांचा उपवास व काही वनस्पतींचा वापर करून शारारिक दोष नियंत्रित ठेवण्यासाठी सांगितलेले आहेत. परंतु कालांतराने अनेक गैरसमज निर्माण होवून आजकाल चुकीच्या पद्धतीने पूजा पाठचे कर्मकांड केले जातात, त्यात फक्त पूजा पाठ होतो पण फायदा पाहिजे तसा होत नाही. म्हणून त्यासाठी त्या पावसाळ्यात वाढणाऱ्या पोटाच्या व हृदयाच्या आजाराला हितकारक चर्या म्हणजे शिवशंकराची आराधना होय, आराधना करताना वापरण्यात येणाऱ्या वनस्पती व मंत्र पचन शक्ती सुधारून ह्रदयाला बळ देणारे आहेत, त्यामुळे ह्या ऋतुमधील संभाव्य आजार टाळतात. शिवाचे स्थान हृदय, हृदयाच्या ठिकाणी अनाहत चे स्थान (प्रभावी बीजमंत्र यं )आहे, जप मंत्र आहे ओम नमः शिवा 'य' त्यामुळे directly अनाहत चक्रावरती प्रभाव पडून हृदयाला supply करणाऱ्या चेता पेशींना मंत्र जपाने ताकद मिळते.आणि हृदयाचे आजार कमी होतात.तुम्हाला माहीत आहे का एखाद्या व्यक्तीचा मृत्यू घोषित करताना त्याच्या हृदयाचे ठोके बंद झाले की केले जाते न की मेंदू -किडनी-फुफ्फुस बंद झाल्यावर. म्हणूनच म्हटले जाते ना शिव हा नाशाचा देवता आहे , तो जो पर्यंत त्याचा आशिर्वाद आहे तो पर्यंत कसली भीती नाही ते ह्या मुळेच असावे. त्याच बरोबर शिवाला वाहिले जाणारे दूध हे पित्त शामक आहे, धत्तूर फळ हे फुफ्फुसच्या व हृदयाच्या जुनाट आजारावर लवकर उपचार म्हणून शुध्द करुन वापरले जाते.बेलाचे फळ पोटाच्या सर्व आजारावर वापरले जाते.बेलाचे पान शिवपिंडीवर वाहिले जाते.ह्या पानाच्या फक्त स्पर्शाने किंवा अभिमंत्रित पाण्याने शरीरातील दाह कमी होतो आणि अनेक आजार ही बरे होतात. (त्याच्या कल्पांचा पुढे विचार करुया) ह्या पद्धतीने समजून घेवून जर शिव शंकराची आराधना केली गेली तर आपल्या शरीरातील पित्त-उष्णता-विषक्तता कमी होईल, कारण समुद्र मंथन च्या वेळी जेव्हा हलाहल(विष) बाहेर पडले त्यावेळी ते नियंत्रित करण्याचे सामर्थ्य फक्त भगवान शिव शंकरकडेच होते, परंतु त्ते विष प्राशन केल्याने त्यांच्या शरीरात दाह निर्माण झाला आणि मग तो दाह कमी करण्यासाठी दूध, बेल फळ, बेल पत्र जल अभिषेक, धत्तूर वापरण्यात आले, त्यांच्या माथ्यावर चंद्र धारण केलाय आणि हिमालयात त्यांचे वसतीस्थान आहे.तसेच जेव्हा आपण मंत्र-रुद्र-शिवसहस्र नाम उच्चार करुन बेलाच्या पानाचा अभिषेक पिंडेवर करतो तेव्हा त्या मंत्रांचा प्रभाव त्या पिंड यंत्राच्या माध्यमातून त्या अभिषेक केलेल्या पाणी किंवा जलावर एकत्रित होवून जातात. पाण्यामध्ये अनेक memory store होतात हे आत्ता सिद्ध झालंय. त्यामुळे हे सिद्ध पाणी/जल तीर्थ म्हणून प्राशन केले गेले तर शरीरातील सर्व आजार बरे होण्यासाठी नक्की मदत होईल.(फक्त हे सर्व करताना स्वछता पाळणे खूप महत्त्वाचे असते, नाहीतर तेच अस्वच्छ जल शरीराला त्रास देवू शकते) देवाला स्वछता सौच खूप आवडतेच. त्यामुळे ह्या श्रावणात ह्या सर्व गोष्टींचा अर्थ समजून घेवून साधना नक्की करा व मन एकाग्रतेसाठी व शाररिक सुदृढतेसाठी श्रद्धेन शिवपिंडीचे पूजन करा. श्री विश्ववल्लभ आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल व गर्भसंस्कार केंद्र, नाशिक-पुणे-ठाणे वैद्य जीवन जाधव 9860633147 वैद्य स्नेहल जाधव 976625487
 2023-08-27T18:19:43

Related Posts

update image

जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र नाशिक

2025-11-28T10:16:32 , update date

 2025-11-28T10:16:32
update image

सर्वांना कळवण्यास आनंद होतो कि, आपल्या जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र येथील गर्भसंस्कारारीत बालायुर्वेद...

2025-10-18T05:19:00 , update date

 2025-10-18T05:19:00
update image

सर्वांना कळवण्यास आनंद होतो कि, आपल्या जिजाऊ गर्भसंस्कार केंद्र येथील गर्भसंस्कारारीत बालायुर्वेद...

2025-08-28T05:35:11 , update date

 2025-08-28T05:35:11
update image

Shree Vishwavallabh Ayurvedic panchakarma & Garbhasanskar centerBaby no.1650It is a pleasure to...

2025-08-14T06:54:32 , update date

 2025-08-14T06:54:32

footerhc